Thursday, 19 January 2017

कळा अंतरीच्या .....

कळा अंतरीच्या....

झोपायला तसा उशीरच झाला होता,आणि नेमके तेव्हाच  रस्त्यावर कुणा कुत्र्याने भुंकायला सुरूवात केली. दोनदा भुंकेल, तीनदा भुंकेल आणि मग थांबेल असच वाटलं.पण नाही, त्याचं भुंकणं चालूच राहीलं, अगदी जोरजोरात. आवाज वाढतच गेला. दमून झोपायच्याच वेळेलाअसा आवाज म्हणजे.... पण त्रास काही मला एकटीलाच होत नसावा. सगळ्यांच्याच गाढ झोपेची वेळ ती. म्हणजे सगळेच त्रस्त झालेच असणार.

Friday, 4 March 2016

Snap Shot - 5

स्नॅप शॉट - 5






























शालिनी पॅलेस, रंकाळा, कोल्हापूर.


सुंदर, भव्य ऐतिहासिक वास्तू. परंतु, समय आणि कायदा यामध्ये गुरफटून दुर्लक्षित होत चाललेली.

Wednesday, 3 February 2016

“मॉल”करी

“मॉल”करी


चातुर्मासात, आषाढी-कार्तिकी एकादशीला भक्त पंढरपूरला जात असत – अजूनही जातात. ही पंढरपूरची वारी, आणि म्हणून, ते वारकरी. हे भक्त विठोबाची माळ आवर्जून गळ्यात घालत, त्यामुळे त्यांना माळकरी असेही म्हणत.

तर आधीच्या काळी असे होते हे माळकरी, आणि आजच्या काळात आहेत “मॉल”करी. त्याच नेमाने आणि तेवढ्याच भक्तिभावाने मॉलच्या वार्‍या करणारे ते मॉलकरी.

महिन्याचे घर-सामान भरायचे आहे – चला मॉलमध्ये; कपडे-भेटवस्तू यांची खरेदी करायची आहे – मॉलमध्ये कुठेतरी सेल असेलच; पिक्चर बघायला जायचे आहे – आहेत ना इतके स्क्रीन्स मॉलमध्येच; कुणाकडून ट्रीट उकळायची आहे किंवा घरात कुणाची अ‍ॅनिव्हर्सरी वगैरे? – मग मॉलमध्ये किती ऑप्शन्स आहेत-फूड कोर्ट तर आहेच शिवाय खास रेस्तराँ पण आहेतच; लहान मुलांना रविवारचं स्पेशल फिरायला न्यायचय – मॉलमध्ये मुलांसाठी किती गेम्स आहेत; नुसताच टाईमपास करायचा आहे – मॉल झिंदाबाद!

‘सर्वकाही एका छताखाली’ उपलब्ध असतांना दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? जसे एखाद्या औषधाची जाहिरात करतात – सर्व आजारदुखण्यांवर एकच रामबाण इलाज! त्याचप्रमाणे – तुम्हाला काहीही करावयाचे असो, गंतव्य स्थान – डेस्टिनेशन – एकच. मॉल!

अगदी फार नाही, काही थोड्याच वर्षांपूर्वी हे दृश्य अगदी वेगळे होते. कार्यक्रम काय आहे यावर जाण्याचे ठिकाण अवलंबून असे. नुसती खरेदी जरी म्हंटली तरी कशाची खरेदी करायची आहे त्याप्रमाणे – कपड्यांची असेल तर एका ठिकाणी, घरच्या वस्तू-तर दुसरीच जागा. शनिवार-रविवार फिरायला जाणे म्हणजे – सहजच जायचे असेल तर जवळपासची एखादी बाग; थोडा खास प्रोग्राम म्हणजे – मुंबईकरांसाठी चौपाटी, शिवाजी पार्क तर उपनगरवासियांसाठी जुहू बीच, अक्सा बीच वगैरे. आता आमच्या शेजारच्या तीन वर्षांच्या चिमुरडीला जरी विचारले, तर पट्कन उत्तर येते – टाईम झोन!

काही खास कारणांनीच मॉलमध्ये जाणे होते असेच जरूरी नाही. सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब घराबाहेर पडायचे असेल तर जायचे एकच ठिकाण! त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवशी, शनिवारी-रविवारी तर हे मॉल्स भरभरून, ओसंडून वाहात असतात.

आता हे मॉलकरी असणं यामध्य काही वावगं आहे असे इथे अजिबात म्हणायचे नाहीये. प्रत्येक काळानुसार बदल होणारच. पूर्वी जे जुहू बीचचे, तिथल्या मोकळ्या वार्‍याचे, भेळपुरी-पाव भाजीचे आकर्षण होते तेच आता मॉल्सच्या नीटनेटक्या, अतिसुंदर वातावरणाचे, तिथल्या आकर्षक प्रेझेन्टेशन्सचे, तिथल्या सुखसोयींचे! हे मात्र अगदी खरे की इतकी नीटनेटकी टापटीप, इतकी स्वच्छता, इतका व्यवस्थितपणा बाहेर कुठेही पाहायला मिळणार नाही.




हे मॉल्स आणि त्यातील चमकदार दुकाने प्रथम आली तेव्हा रीटेल दुकानदारांची धाबी दणाणली. त्यांच्या व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला. पण तीच समस्या आता मॉल्सच्या समोर उभी ठाकली आहे. ऑनलाईन शॉपिंगची इतक्या वेगाने वाढ होत आहे की मॉल्समधली दुकाने आता ओस पडू लागली आहेत. या ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर सेल्स व सवलती खूपच असल्याने, दोन-तीन क्लिक्स करून घर-बसल्या जर स्वस्त्यात वस्तू मिळणार असतील, तर मॉल्सच्या दुकांनांचे भारी दर कोण भरेल? काही जण तर तिथल्या दुकानांत ट्रायल करून आपल्या कपड्यांचे साइझ वगैरे नक्की करतात, मग घरी येऊन ऑनलाईन साइटवरून तेच सर्व अर्ध्या किंमतीत ऑर्डर करतात.

परिणामान्ती जे भराभर शिखर चढून गेले ते त्याच वेगाने खालीही घसरू लागले. आमच्या जवळपासच्या उच्चभ्रू वस्तीतील दोन मोठे मॉल्स संपूर्णतः बंद करण्याची वेळ आली.

काही बाबतीत हे जरी खरे असले तरी नवीन मॉल्स निर्माण होतच आहेत आणि अस्तित्वातील बरेचसे आपल्या रंगीबेरंगी चमचमाटासह जोमाने वाढतही आहेत. ही सारी कृपा मॉलकरी समूहाची. तेव्हा, जय  मॉलकरी!! 


Image courtesy: sftodo.com, 10best.com

Saturday, 2 January 2016

स्नॅप शाॅट - 4 आभाळरंग

स्नॅप शाॅट - 4

आभाळरंग


मावळतीचे आकाश आणि हलक्याश्या ढगांनी रेखांकित केलेले वार्‍याचे झोत .........

Thursday, 10 December 2015

स्नॅप शॅाट - 3 आभाळरंग

स्नॅप शॅाट - 3

आभाळरंग



मुंबईसारख्या शहरात इमारतीँच्या गर्दीतून आकाश दिसणे देखील कठीण.
पण हे तर आहे वृक्षांच्या झालरीतून डोकावणारे आभाळ  -- ते ही मुंबई मध्येच!

Wednesday, 25 November 2015

स्नॅप शॅाट 2 under: स्नॅप शॅाट्स

स्नॅप शॅाट 2

आभाळरंग

  नभ मेघांनी आक्रमिले ..........

जेव्हा पहावे तेव्हा आकाश एक एक नवीन रूप घेऊनच आपल्या पुढे येते, नाही का?
हे आहे पावसाळी जलदांनी ओथंबलेले आभाळ, बंगलोर येथील. आणि तेही ऐन दिवाळीत!


Sunday, 22 November 2015

धुमसणारे पर्वत


कॅनडाच्या उत्तरेतील थंड प्रदेशात एक दुर्मिळ आणि अपूर्व गोष्ट पहावयास मिळते ..... धुमसणारे पर्वत!

आर्क्टिक समुद्राजवळ, कॅनडाच्या उत्तरी तटावर ही अभूतपूर्व गोष्ट दिसून येते.
ब्लूफोर्ट समुद्राच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्र-भागास आता फ्रॅँकलिन बे या नावाने ओळखले जाते. या मागेही एक छोटीशी गोष्ट आहे. सर जॅान फ्रॅँकलिन यांची संशोधन मोहीम याच प्रदेशात बेपत्ता झाली होती. 1850 मध्ये ब्रिटीश नेव्ही कॅप्टन रॅाबर्ट मॅक्लूअर यांना त्यांच्या शोधार्थ पाठविले गेले. ब्लू फोर्ट समुद्र क्षेत्रात त्यांच्या शोध गटाला धूर निघतांना दिसला, ज्याला ते सर्व फ्रॅँकलिनच्या छावणीतून निघणारा धूर समजले. जवळून प्रत्यक्षात पहाता त्यांच्या लक्षात आले कि तो धूर समुद्र तटावरील पर्वतांतून निघत होता. त्या समुद्र भागास फ्रॅँकलिन बे हे नाव पडले.





File:Smoking Hills AXW 0131.jpg





 या स्मोकिंग हिल्स किंवा धुमसणार्‍या पर्वत कड्यांवर लिग्नाईट म्हणजेच तपकिरी काळ्या रंगाच्या दगडी कोळश्याचे प्रचंड साठे पसरलेले आहेत. या मध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असलेले पातळ थरांचे खडक आणि सल्फर  असलेले पायराईट नावाचे चकचकीत पिवळे खनिज असते. या रासायनिक संयुगांस हवा लागताच ते पेट घेतात व धूर निर्माण होतो. या धूरामध्ये सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वातावरणात सतत एक विशिष्ट गंध पसरलेला असतो, तसेच या वायूमुळे जवळपासच्या सरोवरांचे पाणी आम्लयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

कॅनडाचा हा प्रदेश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्याने येथे कमालीची थंडी असते. अश्या या अतिशीत प्रदेशातही हे पर्वत कडे अनादि काळापासून धुमसत आले आहेत आणि वर्षानुवर्षे ते तसेच राहतील. ही निसर्गाची किमयाच नाही का?

Image Courtesy: commons.wikimeidia.org.