Monday 3 April 2017

जीवाची किंमत!

जीवाची किंमत!


आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्राण्यांवर होणार्‍्या अत्याचारांची बातमी वाचली आणि धक्काच बसला. प्राण्यांवर अत्याचार होतात, त्यांना अकारण दुष्टतेने वागवले जाते हे वेळोवेळी वाचनात येते; परंतु या गुन्ह्यासाठी दंड हा केवळ 50 रूपये, किंवा जास्तीत जास्त 100 रूपये होऊ शकतो हे वाचून मात्र खूपच धक्का बसला.

प्राण्यासाठी काम करणार्‍्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहे कि प्राण्यांच्या अधिकारांबाबत सामान्य जनांमध्ये जाणीव करून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी पोस्ट्स लिहिल्या गेल्या पाहिजेत कारण बहुतेक कोणालाच हे माहीत नसते कि प्राण्यांनाही हक्क असतात, परंतु त्यांच्या विरूध्द केल्या गेलेल्या गुन्ह्यांना मात्र इतका कमी, नाममात्र दंड असतो. ही शरमेची गोष्ट आहे पण मला कबूल करायला हवे कि मला देखील हे माहीत नव्हते कि जनावरांना छळणारे दुष्ट इतक्या सहजा सहजी, इतक्या कमी पैशावर सुटून जाऊ शकतात.

Image result for images of stray animals

हे असे का? प्राण्यांना जीव नसतो? त्यांना दुखापत, वेदना होत नाहीत? त्यांना बोलता येत नाही, ते कोणत्याही कोर्टात जाऊन केस करू शकत नाहीत व अपराध्यांना सजा देववू शकत नाहीत – केवळ या कारणांमुळे त्यांच्यावर अत्याचार करणारे गुन्हेगार इतक्या सहजपणे सुटून जाऊ शकतात? म्हणजे त्यांच्या जीवाची काही किंमतच नाही?
अतिशय बाईट गोष्ट आहे ही!

आजकालच्या जमान्यात तर 50 रूपये कोणीही हसत हसत अगदी गटारातही फेकू शकतात. सर्वांच्याच, अगदी मुलांच्या हातातही इतके पैसे, इतका पॉकेटमनी असतो कि 50 रूपये द्यायला लागले तर कोणालाही त्याचा जराही पिंच जाणवणारही नाही, शाळकरी मुलांनाही नाही जाणवणार. तेव्हा कोणीही हाच विचार करेल ना कि थोडी मजा करू, lets get some kicks (People find fun in troubling some innocent, dumb animals who cannot protest? How sadistic humans can get?) थोडं सतावू जनावरांना, गंमत! कोणी पकडलेच तर जास्तीत जास्त काय होईल? 50 रूपयेच भरावे लागतीला ना? भरू! त्यात काय मोठसं!

बातमीमध्ये हेही लिहिले होते कि जी व्यक्ती सतावत होती त्याला लहान मुले टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. यावरून कल्पना करावी कि मुलांना काय शिकवले जात आहे. का हे पालक मुलांना शिकवत नाहीत कि प्राणीही आपल्यासारखे जीवच असतात, त्यांना त्रास देऊ नये; का हे पालक आपल्या मुलांना ही जाणीव करून देत नाहीत कि दुसर्‍्या कोणत्याही जीवाला सतावणे हे योग्य नाही, आपल्यासारख्याच त्यांनाही वेदना होतात. मी तर हे नेहमीच म्हणते कि लहानपणापासून मुलांच्या मनावर या गोष्टींचे महत्त्व बिंबवायला हवे, तरच पुढल्या पिढीमध्ये ही मनोविकारी क्रूरता कमी होईल.

पण या मूक प्राण्यांच्या जीवाची किंमत इतकी नगण्य ठरवली गेली तर कोण कशाला ध्यान देईल? जर हा दंड कमीत कमी 500 किंवा 1,000 रूपये असेल, तर आपल्या मजेसाठी प्राण्यांवर हात उगारण्याआधी हे दुष्ट थोडा तरी विचार करतील. तेव्हा या मुक्या जनावरांचे आयुष्य हे शासनाच्या व न्यायप्रणालीच्या हाती आहे

Image Source: Here

No comments:

Post a Comment