Friday 16 October 2015

असच काहीसं ......


अनपेक्षित काही दृष्टीस पडले .....
काही शब्द मनात उमटले, त्यातूनच काही ओळी बांधल्या गेल्या.....
परंतु या ओळींना 'कविता ' हे नाव देण्याचे धाडस काही करू शकत नाही.
म्हणूनच,  ' असच काहीसं .... '

                                                     इवलिशी 

अचानक ती दिसली,
ना ध्यानी ना मनी.
तीच होती का ती?
का आणखी कोणी?
कठड्यावरून बघितलं ओणवूनी,                           
नक्की होती तीच, खात्रीनी.
छोटीशी, नाजूकशी, चटपटीत
हरवलेली आपल्याच नगरीत.
पण इथे कशी, इथे ना जंगल ना झाडी,
इथे तर फक्त धावणार्‍या माणसांची दाटी.

खुट्ट झालं तरी पळते एरवी,
ट्रेनच्या गोंगाटात वाटत नाही भीती? 
धावणार्‍या गाड्या, रेलरूळांचा खडखडाट
आरडाओरडा, पण ही तर आपल्याच नादात.
सेकंदकाट्यावर धावत पूल रेल्वेचा चढतांना,
दिसली खालच्या पत्र्यावर ती तुरतुरतांना.
चिमुकली खारूंटी, गोजिरवाणी गोडशी,
पण खरंच वाटेना, ही अशी इथे कशी?

आणला तिने आपल्यासवे त्या एका क्षणापुरता,
निरव गारवा तो दूरच्या रानाचा वनराईचा.
थबकले पाय क्षणभरी, दृष्टी तिच्या लीलांवरी,
पण नाही थबकत सेकंदकाटा, नाही ती गाडी,
खेचलेच पाय, आहेच वेळेबरोबर धावणं,
सवे होती फक्त त्या इवल्या झलकीची आठवण!File:Indian Palm Squirrel 2013.jpg
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------



[Image courtesy: Wikimedia commons].

No comments:

Post a Comment